इगतपुरी – किराणा दुकानाचे शटर तोडून १५ हजार रोख रक्कम व दुकानातील साहित्य असा ३० हजाराचा एेवज चोरट्यांनी लंपास केला. इगतपुरी तालुक्यातील महामार्गालगतच्या पाडळी फाट्यावरील ही घटना घडली. दीपक धांडे यांचे कपड्याचे व किराणा दुकान असून किराणा दुकानात ही चोरी केली. धांडे हे काल रात्री दुकान बंद करुन घरी गेले होते. त्यानंतर रात्री दोन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी किराणा दुकानाचे शटर वाकवून दुकानात प्रवेश केला. यातील १५ हजार रोख रक्कम व दुकानातील काही किराणा साहित्य असे एकुण ३० हजार रकमेची चोरी केली. जवळच असलेल्या नागरिकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी दीपक धांडे यांना घटनेची माहिती दिली. या चोरीप्रकरणी धांडे यांनी वाडीव-हे पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.