नाशिक – दीड वर्षाच्या मुलीचे अपहरण करणाऱ्याला पोलिसांनी गजाआड करुन मुलीला तिच्या पालकांच्या ताब्यात दिले आहे. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. मजूरी काम करणा-या अनिताकुमारी जितेंद्र भारती या कामावर गेल्या असताना त्यांची दीड वर्षीची मुलगी सुमिया जितेंद्र भारतीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केले होते. या अपहरणाची तक्रार आईने दिल्यानंतर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर अपहृत मुलीचा तपास करत असताना सपोनी गणेश शिंदे पोलीस शिपाई हेमंत आहेर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सदर मुलीचे अपहरण एका व्यक्तीने केले असल्याचे त्यांना समजले. यावरून वपोनी भगीरथ देशमुख, पोलीस निरीक्षक गुन्हे श्रीकांत निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी गणेश शिंदे, उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस अंमलदार हेमंत आहेर, दिनेश नेहे, जितेंद्र वजिरे, सम्राट मते, सुवर्णा सहाने यांच्या पथकाने सापळा रचत संशयितांस अटक केली.