नाशिक : तारवालानगर भागात बँकेचे ओळखपत्र विचारल्याने अनोळखी वसूली अधिका-याने बेदम मारहाण केली. या मारहाण प्रकरणी दिपक भास्कर अग्रहाकर (४० रा.शिवनगर,तलाठी कॉलनी तारवालानगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. या हाणामारीत त्यांच्या खांद्याचे हाड मोडले असल्याचेही म्हटले आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अग्रहाकर रविवारी रात्री आपल्या घरी असतांना एक अनोळखी तरूण त्यांच्या घरासमोर आला. अतुल जाधव असे नाव सांगत त्याने मी एचडीएफसी बँकेचे वसूलीचे काम करतो तुमच्याकडे बँकेचे ८० हजार रूपये बाकी आहेत. ते तुम्ही भरूण टाका यावेळी अग्राहकर यांनी त्याच्याकडे ओळखपत्राची विचारणा केली असता ही घटना घडली. संतप्त युवकाने अग्रहाकर यांना शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी मारहाण केली. याघटनेत संशयिताने वीट फेकून मारल्याने अग्रहाकर जखमी झाले. अधिक तपास हवालदार गायकवाड करीत आहेत.