नाशिक – देवळाली कँम्प येथील अनिता बाळासाहेब शिरोळे (वय ४३) व राखी बाळासाहेब शिरोळे (वय २३) या मायलेकींनी सोमवारी सकाळी रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या दोघींच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या आत्महत्येप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बार्नस्कूल जवळील पाळदे मळ्याजवळ असलेल्या रेल्वे मार्गावर या दोन्ही माय लेकींनी सकाळी ११ वाजेपूर्वी आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शिरोळे कुटुंबीयांची वापरती स्कूटी रेल्वे रूळापासून काही अंतरावर आढळून आल्याचेही त्यांनी सांगितले. मयत अनिता शिरोळे यांचे पती बाळासाहेब शिरोळे हे रेल्वेचेच ठेकेदार असून ते कामामुळे सध्या सोलापूर येथे आहे. एकाच वेळी आई व मुलीने आत्महत्या केल्याने परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.