बुधवार, जून 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक – एकाच दिवशी विविध भागातून ४ दुचाकी चोरट्यांनी केल्या लंपास

by India Darpan
जून 13, 2021 | 8:41 am
in क्राईम डायरी
0
crime 6

चार दुचाकी लंपास
नाशिकः शहरात वाहन चोरीचे सत्र सुरू असून एकाच दिवशी विविध भागातून ४ दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आडगाव, गंगापुर, अंबड, मुंबईनाका या पोलीस ठाण्यांमध्ये नोंद करण्यात आली आहे. गंगापुर रोडवरील श्रीगुरूजी रूग्णालयासमोर पार्क केलेली दुचाकी चोरट्यांनी लंपास केली. याप्रकरणी संजय पोपट लहांगे (५०, रा. निमाणी बस स्टँडजवळ, पंचवटी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार त्यांनी ८ जुन रोजी दुचाकी पार्क केली होती. ती आढळून न आल्याने तक्रार दाखल केली . दुसरी घटना आडगाव माडसांगवी परिसरात २ मार्च दरम्यान घडली. याप्रकरणी अविनाश आनंदराव पठाडे (रा. आडगाव, पोलीस सोसायटी) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांची दुचाकी शेताच्या बांधावरून चोरट्यांनी पळवून नेली. वडाळारोडवरील नागजी सिग्नल जवळ राहणारे तौसिफ मेहमुद शेख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची अॅक्टीवा दुचाकी इमारतीच्या पार्किंमधून चोरट्यांनी ९ जुनच्या मध्यरात्री चोरून नेली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौथी घटना नवीन नाशिकच्या पाटीलनगर येथे घडली. येथील संजय बळीराम पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची लाल रंगाची बजाज पल्सर दुचाकी चोर्‍यांनी घरासमोरून चोरून नेली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

….

अपघाता जखमीचा मृत्यु
नाशिकः पुणे – नाशिक महामार्गावर पळसे येथे अपघतात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचार दरम्यान मृत्यू झाला . विजु रामु मुकणे (४५, रा. भरवीर ता. इगरपुरी) असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार १० जुनला पुणे – नाशिक महामार्गावर पळसे येथे दुचाकीचा अपघात होऊन मुकणे हे गंभीर जखमी झाले होते. टोलनाका ऍम्बुन्सद्वारे त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान उपचार सुरू असताना शनिवारी त्यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

…..

गळफास घेऊन युवकाची आत्महत्या
नाशिकः राहते घरी गळफास घेऊन युवकाने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि.१२) सातपुर परिसरात घडली. अनिकेत सुरेश दराडे (२० ,रा. अशोकनगर, सातपुर ) असे आत्महत्या करणार्‍या युवकाचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार दराडे याने शनिवारी दुपारी राहते घरात दोरीच्या सहाय्याने छताच्या पंख्यास गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी सातपुर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

….

 

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – आले खरेदीत कर्नाटकच्या एजंटने घातला ३ लाख ७० हजार रूपयांना गंडा 

Next Post

पाकच्या तुरुंगातून कुलभूषण जाधव यांची लवकरच होणार सुटका

India Darpan

Next Post
kulbhushan jadhav

पाकच्या तुरुंगातून कुलभूषण जाधव यांची लवकरच होणार सुटका

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

jail1

प्रवासात महिलेचा विनयभंग करणा-या रिक्षाचालकास पोलीसांनी केले गजाआड

जून 25, 2025
nia11

पहलगाम प्रकरणातील तपास व दहशतवादी हल्ल्याच्या अटकेबाबत एनआयएने दिले हे स्पष्टीकरण…

जून 25, 2025
crime 13

बांधकाम साईटच्या सातव्या मजल्यावरून पडल्याने ३० वर्षीय मजूराचा मृत्यू

जून 25, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषदेतील मान्यता नसलेल्या कर्मचारी संघटना तोंडघशी…नेमकं घडलं काय

जून 25, 2025
bus

आषाढी पंढरपुर यात्रेनिमित्त नाशिक जिल्ह्यातून ३०० बसेसचे नियोजन….

जून 25, 2025
trump 1

विशेष लेख…ट्रम्प यांचा पुन्हा आगाऊपणा

जून 25, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011