औद्योगीक वसाहतीतील शिवाजीनगर भागात दोघा मित्रांना टोळक्याने केली बेदम मारहाण
नाशिक : औद्योगीक वसाहतीतील शिवाजीनगर भागात मोबाईलवर शिवीगाळ केल्याचा जाब विचारण्यासाठी जाणा-या दोघा मित्रांना गाठून टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत लाथाबुक्यांनी व दगडाने मारहाण करण्यात आल्याने दोघे मित्र जखमी झाले असून याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमन सिंग,सागर चिंचोरे व त्यांचे अनोळखी चार साथीदार अशी दोघा मित्रांना मारहाण करणाºया संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी अविनाश नारायण पाटील (रा.दत्तमंदिरजवळ,शिवाजीनगर) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. पाटील व त्याचा मित्र आफताब यांना संशयितांनी मोबाईलवर शिवीगाळ केली होती. त्यामुळे दोघे मित्र शुक्रवारी (दि.२७) जाब विचारण्यासाठी निघाले असता ही घटना घडली. शिवाजीनगर येथील मशिदीजवळील चौकात टोळक्याने दोघा मित्रांना गाठून शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी व दगडाने मारहाण केली. या घटनेत दोघे मित्र जखमी झाले असून अधिक तपास पोलिस नाईक सरनाईक करीत आहेत.
चोरट्यांनी महिलेची सोन्याची पोत हातोहात लांबवली
नाशिक : गणेश भाजीपाला मार्केट येथे भाजीपाला खरेदी करीत असतांना गर्दीची संधी साधत चोरट्यांनी महिलेची सोन्याची पोत हातोहात लांबवली. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैजयंती पुर्णानंद पाटे (रा.वृंदावननगर,जत्रा नांदूर लिंकरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पाटे या गेल्या मंगळवारी (दि.२४) भाजीपाला खरेदी करण्यासाठी औरंगाबादरोडवरील गणेश भाजी मार्केट येथे गेल्या होत्या. गर्दीत भाजीपाला खरेदी करीत असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ््यातील सुमारे ५० हजार रूपये किमतीची सोन्याची पोत हातोहात लांबविली. अधिक तपास जमादार अरूण पाटील करीत आहेत.