नाशिक : युपीआय व क्यू आर कोडच्या माध्यमातून पन्नास हजार रूपयांला गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. ऑनलाईन फुलांच्या ऑर्डर देवून भामट्यांनी व्यावसायीकाची फसवणूक केली आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राकेश काठे (रा.जानोरी ता.दिंडोरी ) या युवा शेतक-याने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. काठे यांचा फुलांचा व्यवसाय आहे. काठे यांची फुले विदेशात विक्री होत असल्याने बहुतांश ऑर्डरी या त्यांना ऑनलाईन पध्दतीने येतात. देवळाली कॅम्प येथील लष्कराच्या कार्यक्रमासाठी ९१४४०३६५०३ व ८३७०८६७८०८ या मोबाईलवरून त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला होता. फुलांच्या मागणी बरोबरच पैसे पाठविण्यासाठी भामट्यांनी त्यांच्या बँकची गोपनिय माहिती मिळविली. युपीआय व क्यूआर कोडची माहिती मिळवित अज्ञात संशयितांनी त्यांच्या बँक खात्यातील ४५ हजार ९९७ रूपये परस्पर काढून घेतले असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक मोरे करीत आहेत.