नाशिक – नोंदणीकृत ट्रेड मार्कचा गैरवापर केल्याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीसह ट्रेड मार्क अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अश्विन तालूकदार यादव उर्फ विजय (रा.माळी कॉलनी,जेलरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. सलमान वॉल्टर सरे (रा.संत ज्ञानेश्वर नगर,जेलरोड) व सलमानचा मामा मायकल निकाळजे (रा.रोडकडोबावाडी,देवळाली गाव) अशी संशयितांची नावे आहेत. तक्रारदार आणि संशयित कुल्फी विक्रेते असून ते मुक्तीधाम मंदिर परिसरात व्यवसाय करतात. अश्विन यादव यांची विजय सचिन कुल्फी प्रसिध्द आहे. यादव यांनी आपल्या व्यवसायाचा नोंदणीकृत ट्रेड मार्क घेतला असून दुकानास विजय सचिन कुल्फी नावाचा फलक लावला आहे. मात्र शेजारीच व्यवसाय थाटणा-या संशयितांनी यादव यांच्या नावलौकिकास बाधा पोहचविण्यासाठी विजय कुल्फी असे नाव देवून ग्राहकांची दिशाभूल करीत आहेत. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक डगळे करीत आहेत.