आले खरेदीत कर्नाटकच्या एजंटने घातला ३ लाख ७० हजार रूपयांना गंडा
नाशिकः इंडिया मार्ट ऍपद्वारे संपर्क करून १२ टन आले खरेदीची तयारी दाखवून नाशिक येथे आले ताब्यात घेऊन कर्नाटकच्या एकास संशयिताने ३ लाख ७० हजार रूपयांना गंडा घातल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला. याप्रकरणी तोफिक अन्सल फयाज अहमद (रा. दारू दमण स्ट्रीट, चिखमगंलूर, कर्नाटक) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार इंडिया मार्ट या ऍपद्वारे संशयिताने तोफिक यांच्याशी १ जुन रोजी संपर्क साधला होता. त्यावेळी नाशिक येथे आले आद्रकचा चांगला भाव आहे. किलामागे १ रूपया कमिशन घेऊन तुम्हाला चांगले पैसे मिळवून देतो असे सांगून १२ टन आले आणण्यास सांगीतले. त्या प्रमाणे तोफिक यांनी ४ लाख २० हजार रूपयांचा २०४ गोण्या (१२ टन) आले घेऊन ते नाशिक येथे आले होते. संशयितांनी अंबड परिसरातील हॉटेल स्कॉंयलार्क येथे आयशर व पिकअप मधून आले लोड करून संशयित घेऊन गेले. त्यांनी आल्याची परस्पर विक्री केली. तसेच जातना तोफिक यांना १० हजार रूपये व ट्रकचे ४० हजाराचे भाडे देऊन उर्वरीत ३ लाख ७० हजार रूपयांची फसवणूक केली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरिक्षक शेवाळे करत आहेत.
….