सावतानगर भागात घरफोडी, ८० हजाराचे दागिने चोरट्यांनी केले लंपास
नाशिक -नवीन नाशिकच्या सावतानगर भागात बंद घराच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी ८० हजाराचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुजा हर्षद गोसावी (रा. सिद्धिविनायक कॉलनी, सावतानगर, नवीन नाशिक) यांनी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, गोसावी कुंटुंबिय १५ एप्रिल रोजी गावी गेले होते. ते २० एप्रिलला माघारी आले. दरम्यानच्या काळात त्यांच्या घराच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी कपाटातील ८० हजाराचे सोन्याचे दागिणे चोरून नेले. अधिक तपास सहायक निरिक्षक कोल्हे करत आहेत.
……
जेसीबीने लेवल करायची नाही यातून वाद पिता पुत्रास मारहाण
नाशिक – म्हसरूळ परिसरात घरासमोरील जमीनीची जेसीबीने लेवल करायची नाही या कारणावरुन तीघांंनी पिता पुत्रास बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी अलका प्रभाकर लभडे यांनी तक्रार दाखल केली आहे. प्रभाकर लभडे यांनी जेसीबी मशीनद्वारे घरासमोर जमीनीची लेवल करत असताना संशयितांनी लेवल करू नका असे म्हणत कुरापत काढली. त्यानंतर प्रभाकर लभडे व त्यांचा मुलगा गणेश यांना लोखंडी रॉडने बेदम मारहण केली. याप्रकरणी म्हसरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरिक्षक चतुर करत आहेत. मारहाण करणार्या संशयितांमध्ये दिलीप पंढरिनाथ लभडे, शिवनाथ दिलीप लभडे, कैलास लभडे (रा. वरवंडी कॉलनी, भडेवस्ती, म्हसरूळ आडगाव शिवार) अशी नावे आहेत.
…..
वाघाडी नदीच्या पुलावर एकाचा संशयास्पद मृत्यू
नाशिक – वाघाडी नदीच्या पुलावर दिंडोरी रेाड येथील ३७ वर्षीय व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याचा मृत्यु कशाने झाले याबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. राजेश रविंद्र भागवत (३७, रा. सप्तशृंगी अपार्टमेंट, दिंडोरी रोड, म्हसरुळ) असे मृत्यू झालेल्या व्यक्तचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा भाऊ चिन्मय यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार राजेश याचा मृतदेह मंगळवारी (दि.२०) काट्यामारूती चौकाजवळील वाघाडी नदीच्या पुलावर आढळून आला. अधिक तपास पोलीस नाईक खाजेकर करत आहेत.
…….
शहरातील विविध भागातून तीन मुलींचे अपहरण
नाशिक – शहरातील विविध भागातून तीन मुलींचे अपहरण झाल्याच्या तक्रारी पोलिस स्थानकात दाखल झाल्या आहेत. या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या अपहरण प्रकरणात दोन अल्पवयीन मुलीचा समावेश आहे. या अपहरण प्रकरणात जय भवानी रोड या पसिरातून १४ एप्रिल रोजी राहते घराजवळून तक्रार दार महिलेच्या मुलीस अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवुन नेल्याची तक्रार उपनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. तीचा सर्व नातेवाईकांकडे शोध घेऊनही मुलगी आढळून आली नाही. दुस-या घटनेत पळसे कारखाना परिसरातून १८ एप्रिल रोजी अल्पवयीन मुलीस अज्ञात व्यक्ती फुस लावून पळवून नेले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसरी घटना आर्टीलरी सेंटर रोडवरील हरिओम नगर येथे १९ एप्रिल रोजी घडली. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार रात्री मुलगी जवळील किराणा दुकानात गेली होती. सदर रस्त्यातून तीला कोणीतरी फुस लावून पळवून नेले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
…….
मानेनगर परिसरात गळफास घेऊन आत्महत्या
नाशिक – मानेनगर परिसरात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार मंगळवारी (दि.२०) समोर आला आहे. राजा गोदिंवद स्वामी (४१, रा. केरीपट्टी, जि. सेलम, तामिळनाडू, सध्या रा. अशोका मार्ग) असे आत्महत्या करणार्याचे नाव आहे. मंगळवारी दुपारी संशयिताने मानेनगर येथील के.के. वाघ ऍग्रीकल्चर कॉलेजच्या मागील बाजुस आंब्याच्या झाडास गळफास लावून घेत आत्महत्या केली. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार सोनवणे करत आहेत.