नाशिक : रविशंकर मार्गावर भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळल्याने झालेल्या अपघातात १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तनिष्क प्रताप भदाणे (रा.चेतनानगर) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. भदाणे गुरूवारी दुपारच्या सुमारास आपल्या दुचाकीने रविशंकर मार्गावरून प्रवास करीत असता हा अपघात झाला. विजय ममता सिग्नल कडून वडाळाकडे जाणा-या मार्गावरील कृष्णा हाईटस या इमारती समोर भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळल्याने तो गंभीर जखमी झाला होता. कुटुंबियांनी त्यास तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास पोलिस नाईक कोल्हे करीत आहेत.