नाशिक – इंदिरा नगर येथील राजसारथी सोसायटीत झाडावर आंबे तोडण्यासाठी गेलेला सॉफ्टवेअर इंजिनिअरला विजेचा शॉक लागला. त्यात त्याचा मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी ८ वाजता ही घटना घडली. अनिरुद्ध अनिल धुमाळ (वय ३०) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी इंदिरा नगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. अनिरुद्ध धुमाळ आजोबांच्या घरी आला असतांना ही घटना घडली. आंबे तोडण्यसाठी धुमाळ हा शिडीच्या सहाय्याने झाडावर चढला त्यावेळेस त्याच्या हातात लोखंडी पाईप होता. या पाईपचा स्पर्श झाडाजवळून गेलेल्या उच्चदाबाच्या विद्युत वहिनीला झाला. त्यामुळे त्याला शॅाक लागला. या शॅाकचा तीव्र होता असल्यामुळे तो झाडावरून खाली फेकला गेला. त्यात त्याला गंभीर दुखापत झाली. त्याला जखमी अवस्थेतच उपचारार्थ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणी करुन त्यास मृत घोषित केले. पुढील तपास इंदिरानगर पोलीस करत आहेत.