नाशिक – बजरंगवाडी येथे महिलेच्या डोक्यात कोयत्याने वार करत तिच्या आईला व भावाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हाणामारीपासून वाचण्यासाठी तरुणाला लपवले म्हणून टोळक्याने ही मारहाण केली. पिंटू दिवे या तरुणाला मारण्यासाठी संशयित आल्यामुळे त्याला घरात लपवले होते. त्यामुळे चेतन जाधव (२५), राहुल ब्राम्हण (२६), दमयंती जाधव (२५),संगीता जाधव (२४), शेखर काळे (२४), अभिषेक जाधव (२४), प्रकाश शिंगाडे (२५), अभिषेक ब्राम्हण (२६) यांनी ही मारहाण केली. चेतन जाधव याने शितल यांच्या डोक्यावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. तसेच राहुल ब्राम्हण याने शितल यांच्या आईच्या डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केले. शितल यांचा भाऊ हे भांडण सोडवायला मध्ये आला असता इतर संशयितांनी त्याला लाथाबुक्यांनी मारहाण केली व अभिषेक ब्राम्हण याने धारदार शस्राने त्याच्या कमरेवर दुखापत केली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वपोनी सुनील रोहकले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चेतन श्रीवंत करत आहेत.