नाशिक – औद्योगीक वसाहतीत कार अडवून शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी
नाशिक : औद्योगीक वसाहतीत कार अडवून शिवीगाळ करीत त्रिकुटाने एकास जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत संतप्त संशयितांनी धारदार चॉपरने कारची काच फोडून नुकसान केले. संदिप राजपूत,अरूण शेलार व अन्य एक जण अशी संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी जितेंद्र दिवाकर ओगले (४० रा.खांदवे नगर,आनंदवली) यांनी तक्रार दाखल केली आहे. ओगले शुक्रवारी सकाळच्या सुमारास कामानिमित्त अंबड औद्योगीक वसाहतीत गेले होते. बारा वाजेच्या सुमारात ते इनोव्हा एमएच १५ एफटी ५००५ मधून प्रवास करीत असतांना पीएम इलेक्ट्रो अॅटो प्रा.लि कंपनीसमोर संशयितांनी कार अडवून ओगले यांना शिवीगाळ करीत धारदार चॉपरने कारवर हल्ला केला. या घटनेत टोळक्याने कारच्या पुढील काचेसह बोनटवर चॉपर मारल्याने मोठे नुकसान झाले असून पुन्हा सापडला तर जीवंत सोडणार नाही अशी धमकी दिली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.
गळफास लावून आत्महत्या
नाशिक : सातपूर गावातील १५ वर्षीय मुलाने गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर मुलाच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दर्शन राहूल वाघ (१५ रा.उपाध्याय वाडा,सातपूर) असे आत्महत्या करणाºया अल्पवयीन मुलाचे नाव आहे. दर्शन वाघ यांने शुक्रवारी (दि.२०) रात्री अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच वडिल राहूल वाघ यांनी त्यास तात्काळ सिकसिग्मा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी त्यास मृत घोषीत केले. अधिक तपास पोलिस नाईक गायकवाड करीत आहेत.