नाशिक – पंचवटी परिसरात सामाजिक कार्यकर्ते जगदीश जाधव आणि त्यांचा मुलागा प्रणव यांचा राहत्या घरात मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेचे कारण अद्याप समोर आले नसले तरी प्राथमिक माहितीनुसार वडिलांनी कर्जाच्या बोजाला कंटाळून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तर मुलाच्या मृत्यूमागील कारण हे अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेचा पंचवटी पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे. हे दोघेही रात्री जेवण करून झोपले. पण, सकाळी वडील जगदीश जाधव हे फॅनला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. तर मुलगा प्रणव हा बेडवर मयत अवस्थेत आढळून आला.