निफाड – तालुक्यातील खेरवाडीमध्ये दोन युवकांनी एक अल्पवयीन मुलीला धमकी देत बलात्कार केल्याची घटना घडली आहे.या दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर पॉस्को अंतर्गत सायखेडा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाधान बाजीराव संगमनेरे आणि संतोष बेडकुळे अशी आरोपींची नावे आहेत. यातील एका आरोपीला खेरवाडी तर दुसऱ्या आरोपीला दिंडोरी तालुक्यातून अटक करण्यात आली आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये ही घटना घडली होती. पीडित अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिला धमकी देत नराधमांनी बलात्कार केला होता. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेता आरोपींच्या शोधासाठी दोन पथके तयार केली होती. त्यानंतर हे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात सापडले.