नाशिक – घरगुती भांडणातून पतीने पत्नीच्या डोक्यात फावड्याने वार करून खून केल्याची माडसांगवी माळवाडी शिवारात घडली. याप्रकरणी पतीसह पाच संशयितांविरोधात आडगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती विशाल राजाराम कापसे, सुरेश राजाराम कापसे, निवृत्ती शंकर कापसे, शोभा उर्फ अलका निवृत्ती कापसे, बंटी निवृत्ती कापसे ही गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहे.
याप्रकरणी लता रामू जाधव यांनी फिर्यादी दिली आहे. त्यात म्हटले आहे की, पती विशाल राजाराम कापसे व त्यांची पत्नी आरती यांच्यात जुन्या घरगुती वादातून भांडण झाले. त्यात विशालने लाकडी दांडा असलेल्या लोखंडी फावड्याने आरतीवर वार केला. त्यात तिच्या डोक्यावर व तोंडावर गंभीर दुखापत झाली व त्यातच तिचा जागेवर मृत्यू झाला. या भांडणात सासरच्या मंडळींनी तिला शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचेही म्हटले आहे.