नाशिक : अंधारात अॅटोरिक्षा पार्क करून चोरी करण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना पोलिसांनी गजाआड केले आहे. विक्रम सुनिल हांडोरे (रा.मुक्तीधाम ना.रोड) व रूपेश बाळू गायकवाड (रा.दहा चाळ,मालधक्कारोड) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे गस्ती पथक मंगळवारी (दि.१७) रात्री गस्त घालत असतांना पोलीसांनी सिलेक्शन कॉर्नर भागात संशयितांना जेरबंद केले. अंधारात अॅटोरिक्षा पार्क करून संशयित परिसरात चोरी करण्याच्या इराद्याने लपून बसले होते. मात्र गस्ती पथकाने त्यांना हुडकून काढले. याप्रकरणी पोलिस शिपाई एकनाथ बागुल यांनी दिलेल्या तक्रारीवरून देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार जगदाळे करीत आहेत.