नाशिक : नांदूरनाका ते सैलानी बाबा मार्गावर भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळल्याने चालकाचा मृत्यू झाला. दुचाकीवरुन तीन जण प्रवास करत होते त्यात चालक ठार तर दुचाकीवरील दोघे जखमी झाले आहे. आकाश ज्ञानेश्वर उबाळे (२४ रा.प्रिंगव्हॅली सोसा.बोधलेनगर,तपोवनरोड) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव असून या अपघातात विपूल आणि कुणाल नामक युवक जखमी झाले आहेत. उबाळे व त्याचे जखमी दोन मित्र दुचाकीवर विनाहेल्मेट ट्रिपलसिट प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. गेल्या बुधवारी दुपारच्या सुमारास हा अपघात झाला होता. मित्राची दुचाकी घेवून तिघे जण नांदूरनाक्याकडून सैलानी बाबाकडे जाणा-या रोडने प्रवास करीत असतांना आठवण हॉटेल समोर कारला भरधाव वेगात ओव्हरटेक करीत असतांना दुचाकीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळली होती. त्यात तिघे मित्र जखमी झाले होते. त्यातील आकाश उबाळे याचा मृत्यू झाला. या अपघातात मोटारसायकलचेही मोठे नुकसान झाले असून याप्रकरणी त्याचा भाऊ निशांत उबाळे याने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस दप्तरी अपघाताची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक मुन्तोडे करीत आहेत.