नाशिक – सिडकोत महिलेच्या गळयातील दीड लाख रूपये किमतीचे मंगळसूत्र भामट्यांनी ओरबाडून नेले
नाशिक : सिडकोतील पाटील नगर भागात रस्याने पायी जाणा-या महिलेच्या गळयातील सुमारे दीड लाख रूपये किमतीचे मंगळसूत्र भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना घडली. पाठीमागून पळत येवून भामट्याने हे कृत्य केले असून तो दुचाकीस्वार साथीदारासमवेत पसार झाला आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उंटवाडीतील निलीमा दिलीप शिरूळे (रा.जगतापनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. शिरूळे या सोमवारी (दि.१६) रात्री परिसरातील पाटीलनगर भागात गेल्या होत्या. सिध्देश्वर गिरणी जवळील श्री हाईटस अपार्टमेंट समोरून त्या पायी जात असतांना पाठीमागून पळत आलेल्या तरूणाने त्यांच्या गळयातील सुमारे १ लाख ४० हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून अॅक्टीव्हा दुचाकीस्वारासमवेत पोबारा केला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शिंदे करीत आहेत.
मोबाईल टॉवरच्या ६० हजार रूपये किमतीच्या बॅट-या चोरीला
नाशिक : गंजमाळ भागात इमारतीवरील मोबाईल टॉवरच्या ६० हजार रूपये किमतीच्या तीन बॅट-या चोरट्यांनी लंपास केल्या. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रविण भालेराव (रा.हिरावाडी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. भालेराव रिलायन्स – जिओ कंपनीच्या टॉवर देखभालीचे कामकाज पाहतात. गंजमाळ येथील भगवती टॉवर या इमारतीवरील जिओ कंपनीच्या टॉवरच्या प्रत्येकी २० हजार रूपये किमतीच्या तीन बॅट-या चोरट्यांनी चोरून नेल्या. ही घटना शनिवारी रात्री घडली. अधिक तपास पोलीस नाईक कोळी करीत आहेत.