नाशिक – पंचवटी पोलिस ठाण्यासमोर एकाने स्वताच्या हाताची नस कापून घेतली त्यानंतर काही गोळ्या खात त्याने गोंधळ घातला. सचिन मधुकर रणखांबे (वय ४६, गायत्रीनगर) असे नस कापून घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. रणखांबेला पोलिसांनी तातडीने त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. नस कापून घेतल्याचा आरोप असलेल्या संशयिताने त्याच्या घरातील मोठ्या रकमेची उधळपट्टी केली. काही तोळे सोन्याची विल्हेवाट लावून तो घरी आल्यानंतर घरच्या मंडळीनी त्याचा जाब विचारल्यावर तसेच घरी येण्यास प्रतिबंध केल्याने त्याने हे कृत्य केल्याचे त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले.