नाशिक : पत्नीची हत्याकरून पसार झालेल्या पतीनेही आत्महत्या केली. निशांत लक्ष्मीकांत डेंगळे (४१ रा.पवारवाडी,जेलरोड) असे स्व:तास पेटवून घेत आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. गेली तीन दिवस तो जिल्हा रूग्णालयात मृत्युशी झुंज देत होता. शुक्रवारी घाबरलेल्या निशांत डेगळे या पतीने जेलरोड येथील आपल्या राहत्या घराच्या आवारात स्व:ताच्या अंगावर ज्वलनशिल पदार्थ टाकून पेटवून घेतले होते. त्यात तो ४५ टक्के भाजल्याने बहिण स्मिता जाधव यांनी तात्काळ जिल्हा या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहीत अशी की ,त्र्यंबकेश्वर तालुक्यातील नि. बेळे येथे माहेरी गेलेल्या प्रणाली निशांत डेगळे (३५) या पत्नीस संशयिताने सासरवाडीत गाठून पेटवून दिले होते. ही घटना गेल्या सोमवारी (दि.९) दुपारच्या सुमारास घडली होती. घरात कुणी नसतांना कौटूबिंक कारणातून डेगळे दांम्पत्यातील वाद विकोपाला गेल्याने ही घटना घडली होती. संतप्त निशांत याने आपल्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले होते. या घटनेनंतर संशयित पसार झाला होता. तर प्रणाली ८० टक्के भाजली होती. तिचा भाऊ सोपान जाधव यांनी तिला तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता शनिवारी उपचार सुरू असतांना तिचा रूग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी हरसूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर निशांतने आत्महत्या केली.