नाशिक : औद्योगीक वसाहतीतील २९ वर्षीय विवाहीतेने केली आत्महत्या; चार जणांविरूध्द गुन्हा दाखल
नाशिक : औद्योगीक वसाहतीतील अशोकन नगर भागात २९ वर्षीय विवाहीतेने आत्महत्या केल्याची घटना घडली. घर घेण्यासाठी माहेरून पैसे आणावेत या मागणीसाठी मानसिक व शारिरीक छळ केल्याने या विवाहीतेने आत्महत्या केली. याप्रकरणी अभिमन्यू पवार (रा.नाशिक) यांनी तक्रार दाखल केली आहे.या तक्रारीवरुन सासरच्या चार जणांविरूध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील पती आणि सास-यास अटक करण्यात आली आहे
मिलींद दहीते,प्रकाश दहिते,शिला दहिते व मोनाली बोरसे (रा.सर्व मातोश्री फ्लोअर मिल जवळ,जाधव संकुल) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. तेजस्विनी मिलींद दहिते (२९ रा.जाधव संकुल,अशोकनगर) या विवाहीतेने रविवारी आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्यास ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात तिचा मृत्यू झाला. वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून तेजस्विनीचा घर घेण्यासाठी माहेरून पैसे आणावेत यासाठी छळ सुरू होता. त्यातच तिने महिन्यांपूर्वी तिला मुलगी झाल्याने सासरच्या मंडळीचा छळ वाढला होता. त्यातून तिने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी अधिक तपास उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.
घरातून चोरट्यांनी पर्स केली लंपास
नाशिक : जत्रा हॉटेल भागात घरातील बेडरुमच्या खिडकीत हात घालून चोरट्यांनी पर्स लंपास केल्याची घटना घडली. या पर्समध्ये सोन्याचे मंगळसूत्र आणि दोन हजाराची रोकड असा सुमारे ४७ हजार रूपयांचा ऐवज होता. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेतन शिवाजी कानडे (रा.ओम व्हिला अपा,स्वामी समर्थ नगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. कानडे कुटूंबिय शुक्रवारी (दि.१३) रात्री झोपी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी बेडरूमच्या उघड्या खिडकीत हात घालून टेबलावरील पर्स चोरून नेली. यापर्स मध्ये दोन हजाराची रोकड आणि मंगळसुत्र असा सुमारे ४७ हजाराचा ऐवज होता. अधिक तपास जमादार अरूण पाटील करीत आहेत.