नाशिक – तिडके कॉलनीत बंगल्याला रंगकामाला बोलावलेल्या परप्रांतीय कारागिरांनी २३ लाखांचे दागिने केले लंपास
नाशिक – बंगल्याला रंगकामाला बोलावलेल्या परप्रांतीय कारागिरांनी २३ लाखांचे दागिने लंपास केल्याची घटना तिडके कॉलनीत घडली आहे. या चोरीप्रकरणी चांडक सर्कल येथील गौरव अतुल चांडक (वय ३३, गौरव बंगला) यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीवरुन संजय यादव (वय २८, नरोरा तहसिल, कानपूर उत्तरप्रदेश,) साहिल मकसूद अहमद मन्सुरी (वय २७, गुठैय्या, बकेवर जि. फतेहपूर (उत्तरप्रदेश) या रंगकामवाल्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २७ मार्चे ते ४ एप्रिल दरम्यान दरम्यान दोघा संशयितांना बंगल्याच्या रंगरंगोटीचे काम देण्यात आले होते. त्यांनी बंगल्यातील ३०० ग्रॅमचे सोन्याचे बिस्कीट, ८ लाख ५० हजाराची रोकड असा सुमारे २३ लाख ५० हजाराचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार युवक जखमी
नाशिक – पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार युवक जखमी झाल्याची घटना पंचवटीत फुलेनगर भागात घडली आहे. विष्णु खराटे (वय २३, विजय चौक फुलेनगर) असे जखमी युवकाचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी चारला दिंडोरी रोड वर चित्रकुट सोसायटीसमोरुन विष्णु खराटे हा त्याच्या दुचाकीवरुन (एमएच १५ सीएल ४५७२) प्रवास करीत असताना दिंडोरीकडून येणाऱ्या पिक्अपने (एमएच १५ जीव्ही ४४२५) दुचाकीस जोरदार धडक दिली. त्यात, विष्णु जखमी झाला. अपघातानंतर पिक्अप चालक फरार झाला. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे.