नाशिक – उपनगर परिसरात दोन दुचाकी जाळल्या; पोलिस स्थानकात गुन्हा दाखल
नाशिक : दोन दुचाकी जाळून टाकल्याची घटना उपनगर परिसरातील पंचशीलनगर येथे घडली आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला .११ मे रोजी मध्यरात्री अजय दोंदे यांनी काका व स्वत:च्या नावावर असलेल्या दुचाकी घरासमोर पार्क केली होती. रात्रीच्या सुमारास काही समाजकंठक यांनी दोन्ही दुचाकीस आग लावून दोंदे यांचे २५ हजार रुपये किंमतीचे नुकसान केले.
चोरट्यांनी दीड लाख रुपये किंमतीचे सोन्याचे मंगलसूत्र ओरबाडले
नाशिक : शहरात मागील काही दिवसांपासून महिलांच्या गळ्यातून सोन्याचे मंगलसूत्र ओरबडण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून ११ मे रोजी आडगाव येथे राहणाऱ्या महिलेच्या गळ्यातून चोरट्यांनी मंगलसूत्र ओरबाडून नेले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे गाव येथील मिनाक्षी जाधव या आडगाव शिवार परिसरातील रामलीला लॉन्सच्या बाहेर उभ्या असताना दुचाकीवरुन आलेल्या दोघा जणांनी त्यांच्या जवळ येत दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातून दीड लाख रुपये किंमतीचे सोन्याचे मंगलसूत्र ओरबाडून नेले.