नाशिक : पेठरोडवरील दत्तनगर भागात पार्किंगमध्ये लावलेली सायकल चोर नागरीकांच्या सतर्कतेमुळे पकडला गेला. या चोराला नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले असून त्याला पोलिसांनी गजाआड केले आहे. रोशन बाळू वायाळ (२१ रा.पाटालगत तुळजाभवानी नगर,मखमलाबादरोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी विकास शांताराम सुर्यवंशी (रा.ज्ञानेश्वर अपा.दत्तनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुर्यवंशी यांच्या मुलीची सायकल बुधवारी रात्री सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केलेली होती. पहाटेच्या सुमारास पार्किंगमध्ये अचानक आवाज आल्याने सुर्यवंशी यांनी धाव घेतली असता चोरटा पोलीसांच्या हाती लागला. सुर्यवंशी यांनी आरडाओरड करून चोरट्यास पकडले. यानंतर स्थानिकांनी धाव घेतल्याने पोलीसांना पाचारण करण्यात येवून संशयितास त्यांच्या स्वाधिन करण्यात आले. अधिक तपास जमादार ठाकरे करीत आहेत.