नाशिक – शहरातील वेगवेगळ्या भागातून चार मोटारसायकली चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहे. विशेष म्हणजे पार्किंगमधून या मोटरसायकली चोरी करण्यात आल्या आहे. याप्रकरणी आडगाव,म्हसरूळ, अंबड व नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सातपूर येथील केवलपार्क येथून दादासाहेब हरिभाऊ चितळे यांची पल्सर एमएच १५ ईडब्ल्यू ९२८१ गेल्या ३० एप्रिल रोजी रात्री घरासमोर पार्क केलेली असतांना चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर तपोवनातील बाळासाहेब वामन धुमाळ (रा.धुमाळ चाळ,पंचवटी कॉलेज मागे) यांची एमएच १५ सीआर २२५४ ही दुचाकी सोमवारी (दि.२) रात्री त्यांच्या घरासमोर पार्क केलेली असतांना चोरट्यांनी चोरून नेली. धुमाळ आपल्या घरात जेवण करीत असतांना अल्पावधीत ही घटना घडली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक पाटील करीत आहेत. तिसरी घटना नाशिकरोड येथील सिन्नरफाटा भागात घडली. छाया सचिन गांगुर्डे (रा.पगारे मळा,चेहडी शिव,सिन्नरफाटा) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गांगुर्डे यांची एमएच १५ सीबी ८४१० ही सीडी डॉन मोटारसायकल गेल्या २९ एप्रिल रोजी दुपारी सिन्नर फाटा येथील हॉटेल साईराज येथे पार्क केलेली असतांना चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार चौधरी करीत आहेत. म्हसरूळ गावातही मोटरसायकल चोरीची घटना घडली. मोरेश्वर आनंदराव डोईजड (रा.हनुमान मंदिरासमोर,म्हसरूळ) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. डोईजड यांची पॅशन प्रो एमएच १५ एचटी ०७५१ मोटारसायकल रविवारी (दि.१) रात्री त्यांच्या घरासमोर गल्लीत पार्क केलेली असतांना चोरट्यांनी ती चोरून नेली. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार रोकडे करीत आहेत.