नाशिक : कॉलेजरोड भागात बंगल्याच्या आवारातील गॅस भरलेल्या तीन सिलेंडर टाक्या चोरट्यांनी केल्या लंपास
नाशिक : कॉलेजरोड भागात बंगल्याच्या आवारातील गॅस भरलेल्या तीन सिलेंडर टाक्या चोरट्यांनी लंपास केल्या. रितेश अरूण शिरोडे (रा.अश्वमेध बंगला,आनंदवन कॉलनी) यांनी या चोरीप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर गंगापूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरोडे यांनी आपल्या बंगल्याच्या किचनच्या पाठीमागील मोकळय़ा जागेत तीन गॅस सिलेंडर भरूण ठेवले होते. ते चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना सोमवारी रात्री घडली. अधिक तपास हवालदार मोरे करीत आहेत.
विहीरीत ५५ वर्षीय इसमाचा मृतदेह आढळला
नाशिक : चाडेगाव शिवारातील एका विहीरीत ५५ वर्षीय इसमाचा मृतदेह मिळून आल्यानंतर नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या व्यक्तीने मद्याच्या नशेत आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे. शेषराव विक्रम मुळेकर (मुळ रा.कोळपेवाडी,अ.नगर हल्ली पांडूरंग चकोर यांच्या शेतात चाडेगाव) असे विहीरीत मृतदेह आढळून आलेल्या इसमाचे नाव आहे. मुळेकर कुटूंबिय पांडूरंग चकोर यांच्या शेतात वास्तव्यास असून मंगळवारी ही घटना उघडकीस आली. मुळेकर यांना दारूचे व्यसन होते. सोमवारी दिवसभर घरी न परतल्याने दुस-या दिवशी सर्वत्र शोध घेतला असता त्यांचा मृतदेह मालकाच्या विहीरीतील पाण्यात तरंगतांना मिळून आला. अधिक तपास पोलीस नाईक पाटील करीत आहेत.