नाशिक : सिडकोत २२ वर्षीय तरूणीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी संशयितास अटक केली आहे. पाठलाग करत प्रेमाची मागणी करणा-या या तरुणाने पीडितेस जीव मारण्याची धमकी दिल्यामुळे युवतीने पोलिस स्थानकात तक्रार दिली.
आसिफ अन्वर खान (रा.साईबाबानगर,सिडको) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. महाविद्यालयीन तरूणी शिक्षणासह परिसरातील खासगी रूग्णालयात नोकरी करते. संशयित १ जानेवारी पासून तिचा पाठलाग करून प्रेमाची मागणी करीत होता. कॉलेज अथवा रूग्णालयात जाता येतांना तो पाठलाग करून रस्ता अडवित होता. शनिवारी त्याने तरूणीस गाठले. यावेळी त्याने प्रेमाची मागणी केली. मात्र युवतीने त्यास नकार देत चांगलेच सुनावले असता ही घटना घडली. संतप्त संशयिताने युवतीस भररस्त्यात शिवीगाळ करीत विनयभंग केला. यावेळी त्याने जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने तिने कुटुंबियांकडे आपबिती कथन केली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक निलेश राजपूत करीत आहेत.