घरफोडी; चोरट्यांनी ३५ हजाराचा ऐवज केला लंपास
नाशिक : नाशिक पुणे रोडवरील कॉस्मो सोसायटी भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी ३५ हजाराचा ऐवज चोरून नेला. त्यात रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे व मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपक पवनकुमार सुद (३६ रा.कॉस्मो सोसा.सिध्दार्थ हॉटेल समोर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सुद कुटुंबिय २६ ते ३० एप्रिल दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटात ठेवलेली सात हजार रूपयांची रोकड सोन्याचांदीचे दागिणे, तीन मनगटी घड्याळ आणि जेबीएल कंपनीचा ब्ल्यू टूथ स्पीकर असा सुमारे ९५ हजार २०० रूपयांचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक चौधरी करीत आहेत.
महिलेची आत्महत्या
नाशिक : ३० वर्षीय महिलेने आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेत महिलेने आत्महत्या केली. शेवगे दारणा येथे ही घटना घडली आहे. सदर महिलेच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. स्वाती केतन टर्ले असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. स्वाती टर्ले यांनी रविवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरी गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटुंबियांनी त्याना तात्काळ देवळाली कॅम्प येथील कॅन्टोमेंट हॉस्पिटल येथे दाखल केले असता डॉ. अभिषेक पगारे यांनी मृत घोषीत केले. अधिक तपास पोलीस नाईक एस.आर.घेगडमल करीत आहेत.