नाशिक : शिर्डी – नाशिक बसप्रवासात महिलेच्या पर्स मधून सुमारे २ लाख २५ हजार रूपये किमतीचे सोन्याचे गंठण चोरट्यांनी लंपास केले. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नथमल बाबुलाल गुजराणी (७० रा.मोकळनगर,हिरावाडी) यांनी या चोरीप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गुजराणी दांम्पत्य गेल्या शनिवारी साई दर्शनासाठी शिर्डी येथे गेले होते. देवदर्शन आटोपून दुपारी गुजराणी दांम्पत्य शिर्डी बसस्थानकातून सोलापूर पेठ या बसमधून परतीच्या प्रवासाला लागले असता ही घटना घडली. सहप्रवाश्यांपैकी अज्ञात चोरट्यांनी आसनाच्यावरील कॅरीमध्ये ठेवलेल्या बॅगेतील पर्स मधून गजराणी यांच्या पत्नीचे सुमारे २ लाख २५ हजार रूपये किमतीचे सोन्याचे गंठण चोरून नेले. ही बाब घरी परतल्यानंतर समोर आली असून अदिक तपास सहाय्यक निरीक्षक रोहित केदार करीत आहेत.