नाशिक – रिक्षाचालकावर चाकू हल्ला; चालक जखमी, जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू
नाशिक : सीबीएस परिसरातत रिक्षाचालकावर चाकू हल्ला केल्याच्या घटनेत चालक जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुठलेही कारण नसतांना एकाने हा हल्ला केला आहे. सनी बाबू सगट (१९ रा.म्हाडा बिल्डींग,चुंचाळे शिवार) असे चाकू हल्ला करणा-या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी मोहन दगडू कांबळे (२१ रा.साठेनगर झोपडपट्टी,गरवारे कंपनीजवळ) या रिक्षाचालकाने तक्रार दाखल केली आहे. कांबळे मंगळवारी सीबीएस येथील जिवनदीप मेडिकल समोरील रिक्षा थांब्यावर प्रवासी भरत असतांना ही घटना घडली. प्रवाश्यांना रिक्षात बसवित असतांना संशयित तेथे आला व कुठलेही कारण नसतांना कांबळे यांच्यावर हल्ला केला. या घटनेत कांबळे यांच्या पोटावर व हातावर चाकूने वार करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक खैरनार करीत आहेत.
तारेचे कुंपन चोरट्यांनी चोरून नेले
नाशिक : पेठरोडवरील जकातनाका भागात शेताला लोखंडी अँगलने केलेले तारेचे कुंपन चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसंत बाळकृष्ण काकड (६९ रा.काकड मळा,समर्थनगर शेजारी मखमलाबाद) यांनी तक्रार दाखल केली आहे. काकड यांची जकातनाका भागातील शंकर नगर येथे शेत जमिन आहे. गट क्र. ३३५ (३) या शेत जमिनीस त्यांनी लोखंडी अॅगल लावून तारेचे कुंपन केले होते. बुधवारी (दि.२७) रात्री अज्ञात चोरट्यांनी अँगल व काटेरी तारेचे कुंपन कापून नेले. अधिक तपास पोलीस नाईक फुगे करीत आहेत.