नाशिक – मखमलाबाद रोडवर भरधाव दुचाकी घसरल्याने चालकाचा मृत्यू
नाशिक : मखमलाबाद रोडवर भरधाव दुचाकी घसरल्याने ४४ वर्षीय चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. जयराम महादू गायकवाड (रा.इंद्रप्रस्थ नगर,पेठरोड) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. गायकवाड शुक्रवारी दुपारच्या सुमारास आपल्या दुचाकीवर मखमलाबाद गावाकडे जात असतांना हा अपघात झाला. मामाचा मळा हॉटेल समोर भरधाव दुचाकी घसरल्याने ते जखमी झाले होते. मेडिकल कॉलेज येथे प्रथमोपचार करून दिंडोरीरोडवरील एका खासगी रूग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस नाईक सोनवणे करीत आहेत.
राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या
नाशिक : शिंगवे बहुला येथील चारणवाडीत राहणा-या ४२ वर्षीय व्यक्तीने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. सदर इसमाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बाबजी हनुमंत कुसाळकर (रा.चारणवाडी) असे आत्महत्या करणा-या इसमाचे नाव आहे. कुसाळकर यांनी शुक्रवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी त्यांना तात्काळ कॅन्टोमेंट हॉस्पिटल येथे दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास पोलीस नाईक भोईर करीत आहेत.