नाशिक – वणी येथे चारित्र्यावर संशय घेत पत्नीवर कुऱ्हाडीने वार करून जीवे ठार मारल्याप्रकरणी पतीस पोलिसांनी गजाआड केले आहे. लहानू मोतीराम धोंगडे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या घटनेत नंदा लहानू धोंगडे यांचा मृत्यू झाला आहे. दिंडोरी तालुक्यातील चाप्याचा पाडा, देवसाने येथे धोंगडे कुटुंबिय वास्तव्यास आहे. लहानू धोंगडे हे पत्नी नंदा यांच्यावर नेहमी संशय यावरुन दोघांमध्ये भांडण झाले. त्यानंतर रागाच्या भरात लहानू याने पत्नी नंदा हिच्यावर कुऱ्हाडीने डोक्यावर,खांद्यावर हल्ला करत वार केले. या हल्ल्यात नंदा या रक्ताच्या थारोळ्यात खाली पडल्याने त्यांना पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेप्रकरणी मयत नंदा यांचा भाऊ लक्ष्मण तुळशीराम यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीवरुन वणी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.