नाशिक : दातेनगर भागात नातवास सोबत घेवून घराकडे परतणा-या ५३ वर्षीय महिलेच्या गळयातील सव्वा दोन लाख रूपये किमतीची तीनपदरी सोनसाखळी भामट्याने लंपास केल्याची घटना घडली. अनिता दादाजी खैरनार (रा.विश्वास बँकेमागे,दातेनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरुन गंगापूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खैरनार या बुधवारी आपल्या नातवास खेळण्यासाठी घेवून गेल्या होत्या. नातवास सोबत घेवून त्या घराकडे परतत असतांना ही घटना घडली. विश्वास बँकेकडे जाणा-या रस्त्याने त्या पायी जात असतांना गायत्री निवास या बंगल्यासमोर हा प्रकार घडला. पाठीमागून आलेल्या अज्ञात इसमाने त्यांच्या गळयातील सुमारे २ लाख २५ हजार रूपये किमतीची तीन पदरी सोन्याची चैन हिसकावून पोबारा केला. अधिक तपास भिसे करीत आहेत.