नाशिक – आई कामाला गेली असल्याची संधी शोधत एकाने घरात प्रवेश करुन मुलगी व तिच्या भावावर अत्याचार केल्याची घटना शहरात घडली आहे. या घटनेचे व्हिडीओ काढून मुलगी व तिच्या भावाला धमकीही देण्यात आली आहे. या घटनेची तक्रार पीडितेची आईने पोलिस स्थानकात दिली आहे. या तक्रारीवरुन पोक्सो कायद्याअंतर्गत मुंबई नाका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओळखीचा फायदा घेऊन हे कृत्य केल्याचेही समोर आले आहे.









