नाशिक : सराफ बाजारात गर्दीची संधी साधून चोरट्यांनी महिलेच्या पर्स मधील दागिणे केले लंपास
नाशिक : सराफ बाजारात गर्दीची संधी साधून चोरट्यांनी महिलेच्या पर्स मधील दागिणे लंपास केले. आशा सुदाम आवटे (२८ रा.वाघोली जि.पुणे) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. याबाबात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आवटे शहरात वास्तव्यास असलेल्या आपल्या आईकडे आल्या आहेत. दोन्ही मायलेकी शनिवारी दुपारच्या सुमारास अलंकार दुरूस्तीसाठी सराफ बाजारात गेल्या असता ही घटना घडली. एका सराफी पेढीत मायलेकी कर्नफुल आणि अंगठी दुरूस्तीसाठी गेल्या असता गर्दीची संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या पर्स मधील सुमारे ३७ हजार रूपये किमतीचे दागिणे हातोबात लांबविले. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक लोंढे करीत आहेत.
चोरट्यांनी लॅपटॉप व दोन मोबाईल केले लंपास
नाशिक : अमृतधाम भागात उघड्या घरात शिरून चोरट्यांनी लॅपटॉप व दोन मोबाईल लंपास केले. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैभव नाना देशमुख (रा.रामगंगा रो बंगलो,फायर ब्रिगेड मागे) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. देशमुख कुटूंबिय गुरूवारी रात्री आपआपल्या कामात व्यस्त असतांना ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी उघड्या घरात शिरून लॅपटॉपसह दोन मोबाईल असा सुमारे २७ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास पोलीस नाईक आव्हाड करीत आहेत.