नाशिक – गांधी तलावात आंघोळीसाठी गेलेल्या १६ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू
नाशिक : गोदाघाटावरील गांधी तलावात आंघोळीसाठी गेलेल्या १६ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. हसनाईन उमर शेख (रा.कालिका मंदिराच्या मागे विधाते मळा) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने ही घटना घडली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उन्हाच्या तीव्र झळा वाढल्याने गोदावरी नदीपात्रावर आंघोळ करणा-यांची गर्दी वाढली आहे. शेख हा रविवारी सायंकाळच्या सुमारास आपल्या मित्रांसमवेत गोदाघाटावर आंघोळ करण्यासाठी गेला होता. गांधी तलावात तो आंघोळ करीत असतांना पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला होता. अमित धारगे यांनी त्यास पाण्याबाहेर काढून गंभीर अवस्थेत उपचारार्थ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी त्यास मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार शेवाळे करीत आहेत.
दोघांनी एकास केली बेदम मारहाण
नाशिक : रविवार पेठेतील गंगावाडी भागात गावठी कट्टा लावून दोघांनी एकास बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेत युवक जखमी झाला असून याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विक्की ठाकूर आणि राहूल नंदण अशी मारहाण करणा-या दुकलची नावे आहेत. याप्रकरणी प्रताप गजानन बुराडे (३० रा.महादेव अपा.तेली गल्ली) यांनी तक्रार दाखल केली आहे. बुराडे यास रविवारी सायंकाळी संशयितांनी फोन करून गंगावाडीतील गादी कारखान्याजवळ बोलावून घेत त्यास मारहाण केली. मागील भांडणाची कुरापत काढत दोघांनी सध्या तू फार भाई झाला आहेस असे म्हणत शिवागीळ केली. यावेळी विक्की ठाकूर याने त्याच्या पोटास गावठी कट्टा लावला तर दुस-याने लाकडी फळी डोक्यात मारून जखमी करीत लाथाबुक्यांनी मारहाण केली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सुरवाडे करीत आहेत.