नाशिक – डॉन ब्रेकर स्कूलजवळ ध्रुवनगरला घरफोडी; पावणे सहा लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास
नाशिक – डॉन ब्रेकर स्कूलजवळ ध्रुवनगरला चोरट्यांनी घरफोडी करुन पावणे सहा लाखाचा ऐवज लंपास केला आहे. अशोक साहेबराव पाटील (वय ६२, आर्शिवाद दत्तकुंज, डॉन ब्रेकर स्कूलजवळ ध्रुवनगर गंगापूर रोड) यांनी या चोरीची तक्रार दिली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, शुक्रवार रात्री आठला आर्शिवाद दत्त कुंज इमारतीतील घरात दरवाजाचा कडी कोयडा तोंडून घरात प्रवेश करीत चोरट्यांनी लिनोव्हा कंपनीचा लॅपटॉप, गोल्डन रंगाची वॅगनर (एमएच १५ ईबी ८९०५) चाराचाकीची चावी, ४० ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र, २० ग्रॅमची सोन्याची चेन, १० ग्रॅमचे सोन्याचे कर्णफूल, चार ग्रॅमचे सोन्याचे टॉप्स, सहा ग्रॅमची सोन्याची अंगठी, ७ ग्रॅम सोन्याची अंगठी, चार ग्रॅमची सोन्याची लहान मुलाची अंगठी, कानातील २ ग्रॅमच्या रिंगा, दहा हजाराची रोकड असा सुमारे ५ लाख ७२ हजाराचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला.या तक्रारीवरुन गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंदिरानगरला पावणे दोन लाखाची घरफोडी
नाशिक – चोरट्यांनी घरफोडी करुन पावणे दोन लाखांचा ऐवज लंपास केला. ही घरफोडी इंदिरानगरला गजानन महाराज मंदीरासमोर आशीष पार्क भागात घडली. याप्रकरणी याप्रकरणी मनीष पद्माकर जोशी (वय ३२, आशीष पार्क) यांनी घरफोडीची तक्रार केली आहे. या तक्रारीवरुन इंदिरानगर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे. शुक्रवारी ते शनिवारी दरम्यान ही घटना घडली. आशीष पार्क इमारतीतील प्लॅटचे लोखंडी दरवाजाचे मुख्य कुलुप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील दोन्ही बेडरुममधील कपाटातील लॉकर तोडून त्यातील ७५ हजाराची रोकड, अडीच तोळ्याचे मंगळसूत्र, सोन्याची चेन, चार ग्रॅमचे सोन्याचे टॉप्ल, चांदीचे ग्लास, पणती, छल्ला, मेखला, मेखला समई, गडू, पैंजन सा सुमारे पावणे दोन लाखांचा ऐवज चोरुन नेला.