नाशिक – अंबड लिंक रोड वर श्रमिकनगर परिसरात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यु
नाशिक – ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील एकाचा मृत्यु झाल्याची घटना अंबड लिंक रोड वर श्रमिकनगर परिसरात घडली आहे. किसमोहन राजकुमार साहू (वय ३७, अंबड लिंक रोड) असे अपघातात मृत्यु झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पंकज दिलीप शिरोळे (वय २१, सातपूर शिवाजीनगर ) यांच्या तक्रारीवरुन सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी गुरुवारी सायंकाळी साडे पाचच्या ट्रक (एमएच ४४ -८७६५) अंबड लिंक रोडने जात असतांना भरधाव ट्रकने दुचाकी (एमएच १५ एआर ५४९२) हिला धडक दिल्याने दुचाकीस्वार किसमोहन साहू त्याची बहीण सोनिया साहू गंभीर जखमी झाले. अपघातानंतर माहीती न देता ट्रकचालक पळून गेला. काल शनिवारी उपचार सुरु असतांना किसमोहन साहू यांचे निधन झाले.
मारुतीच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी
नाशिक – मारुतीच्या धडकेत दुचाकी स्वार जखमी झाल्याची घटना बोरवड रस्त्यावर गुरुवारी घडली आहे. लखन रामकृष्ण जाधव (वय २४, साई व्हिला ध्रुवनगर गंगापूर रोड) असे जखमीचे नाव आहे. जखमी लखन जाधव आणि शितल दीपक गायकवाड हे त्यांच्या दुचाकी (एमएच १५ जीएम ०१८१) हिच्यावरुन जात असतांना बोरगड रस्त्याकडून कणसरा माता चौकाकडे जात असतांना मारुती (एमएच ०३ ए १०५६) हिच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. याप्रकरणी म्हसरुळ पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.