निवेक क्लब मधून टीव्ही चोरी
नाशिक : स्पोर्टस क्लबच्या छताचे पत्रे उचकटून चोरट्यांनी एलसीडी टिव्ही चोरून नेल्याची घटना सातपूर औद्योगिक वसाहतीतील निवेक क्लब येथे घडली. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नामदेव रघुनाथ निकम (रा.चव्हाण मळा,तपोवन) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सोमवारी (दि.५) रात्री ही घटना घडली. बंद असलेल्या निवेक क्लबच्या छताचे पत्रे चोरट्यांनी उचकटून सुमारे ४० हजार रूपये किमतीचा व भिंतीवर लावलेला व्हिडीओकॉन कंपनीचा टीव्ही चोरट्यांनी चोरून नेला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक नागरे करीत आहेत.
…….
हिरावाडीत ३४ हजाराची घरफोडी
नाशिक : हिरावाडी परिसरातील बंद रो हाऊस फोडून चोरट्यांनी सुमारे ३४ हजाराचा ऐवज चोरून नेला. त्यात रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कैलास जिभाऊ बोरसे (रा.दिपज्योती रो हाऊस,मिनाताई ठाकरे स्टेडिअम जवळ) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. बोरसे कुटुंबिय ९ ते १२ एप्रिल दरम्यान बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून हॉल मधील कपाटातून चार हजाराची रोकड आणि सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ३४ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार वनवे करीत आहेत.
….
चुंचाळेत पल्सरची चोरी
नाशिक : घरासमोर पार्क केलेली पल्सर दुचाकी चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना औद्योगीक वसाहतीतील चुंचाळे शिवारात घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जवाहर बबलू निसाद (रा.चुंचाळे,अंबड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. निसाद यांची पल्सर एमएच १५ एचएल १२८७ गुरूवारी (दि.१५) रात्री त्यांच्या घरासमोर पार्क केलेली असतांना चोरट्यांनी चोरून नेली. अधिक तपास पोलीस नाईक निकम करीत आहेत.