बॅक मॅनेजरकडून १३ लाख ८० हजाराला गंडा; पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
नाशिक – बॅकेत मॅनेजरने खातेदाराला जादा व्याजाचे आमीष दाखवून सुमारे १३ लाख ८० हजाराला गंडाविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी राजेंद्र देवराम जाधव (वय ६०,आडगाव मेडीकल फाटा, ) यांच्या तक्रारीवरुन ॲक्सीस बॅकेचा मॅनेजर संशयित अमित दिलीप कुलकर्णी (पार्वतीबाईनगर पिंटो कॉलनी, जुना सायखेडा रोड दसक) याच्या विरोधात पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी ॲक्सीस बॅकेत , बॅकेत मॅनेजर असलेल्या अमिल कुलकर्णी याने जादा व्याजाचे आमीष दाखवून १ जानेवारी २०१८ ते २४ ऑगस्ट २०२१ दरम्यान ॲक्सीस बॅकेत खाते असलेल्या राजेंद्र जाधव यांच्या अकाउंटची माहीती घेऊन राजेंद्र जाधव यांना बॅकेत बोलावून घेत, त्यांच्या खात्यातील पैसे दुसरीकडे गुंतवणूक करुन त्यावर जादा व्याज मिळवून देतो असे आमीष दाखवून त्यांच्याकडून सह्यांचे धनादेश घेतले. जाधव व त्यांच्या पत्नीच्या खात्यावरुन वेळोवेळी पैसे काढून १३ लाख ८० हजार ३०० रुपयांचे नुकसान केले. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून वरिष्ठ निरीक्षक डॉ. सिताराम कोल्हे तपास करीत आहे.
ठक्कर बाजार स्थानकातून दुचाकी चोरी
नाशिक – ठक्कर बाजार बसस्थानक परिसरात दुचाकी चोरीप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.सागर प्रकाश सोळसे (वय २५, कैलासनगर, नांदूरनाका निलगिरीबाग) यांनी त्यांची होडा शाईन दुचाकी (एमएच ४१ एव्ही १९१३)३ ऑक्टोबरला दुपारी दोनला ठक्कर बाजारातील प्लॅट फॉम क्रमांक दहा येथे लावली असतांना चोरट्यांनी दुचाकी चोरुन नेली.याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे