महिलेला मोबाईल करुन प्रेमसंबध ठेवण्यासाठी जबरदस्ती; गुन्हा दाखल
नाशिक – भाभानगर परिसरातील एका महिलेला मोबाईल करुन प्रेमसंबध ठेवण्यासाठी जबरदस्ती आग्रह धरणाऱ्या भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील भूषण सुभाष चौधरी (अजयनगर, वरणगाव ता.भुसावळ) यांच्या विरुध्द पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. चौधरी या महिलेला शुक्रवारी (ता.१०) सकाळी दहा पासून रात्री साडे आठ पर्यत वारंवार मोबाईलवर फोन करत होता. या फोनवरुन महिलेच्या इच्छेविरोधात प्रेम संबध ठेवण्यास जबरदस्ती करत होता. त्यानंतर या महिलेने पोलिस स्टेशन गाठत या प्रकाराची तक्रार दिली. त्यानंतर याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
दोन दुचाकीची चोरी
नाशिक – शहरात वेगवेगळ्या घटनात दोन दुचाकीची चोरीचा प्रकार उघडकीस आला. पहिल्या घटनेत गफ्फार मेहबुब खान (वय ५५) सादीकनगर वडाळागाव) यांनी त्यांची हिरो होंडा फॅशन प्रो (एमएच १५ डीडब्लू ९२१७) हि सहा सप्टेंबरला सादीकनगर येथील त्यांच्या घरासमोर पार्क केली असता, चोरट्याने रात्रीतून दुचाकी चोरुन नेली. याप्रकरणी गफ्फार खान यांच्या तक्रारीवरुन इंदिरानगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे. तर दुसऱ्या घटनेत संतोष यशवंत पोरजे (वय ३३, वडनेर दुमाला) यांनी त्यांची दुचाकी देवळाली गावातील धाडीवाल कलेक्शन दुकानासमोर लावली असता, बुधवारी (ता.८) सायंकाळी चोरट्याने त्यांची दुचाकी चोरुन नेली. याप्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.