नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिककरांसाठी आजचा दिवस खास होता. कारण, नाशिक पोलिसांमुळे तब्बल सव्वा कोटींहून अधिक किंमतीचा मुद्देमाल नागरिकांना परत मिळाला. त्यामुळे ही बाब या सर्वासाठी खुपच सुखद होती. चोरीला गेलेली वस्तू किंवा ऐवज परत मिळण्याची घटिका तशी दुर्मिळच. आणि तोच अनुभव आज अनेकांनी अनुभवला.
गुन्हे घडु न देणे ही पोलिसांचे काम आहे. प्रतिबंध करण्या पेक्षा गुन्हा उघडकिस करण्याचे काम पोलिस करतात. एखादा गुन्हा घडल्यास पुर्ण कुटुंब वातावरण खराब होते. चैन स्नँचिंग झाली तर महिलेला दोष देताता. वातावरण बिघडण्याची जबाबदारी असते. ओटिपी दिल्या शिवाय एकसेस मिळत नाही. गुन्हेगार टेक्नॉलॉजी जास्त वापर करतो. नकारात्मक गोष्ट घेतो. पोलिस दलात नकारात्मक घटना घडली. मानसिकता असतो नकारात्मक गोष्टिला किती महत्व दलाचे ते स्वता ठरवावे. नागरिकांनी एकमेकांना सहकार्य केल्यास गुन्हे लवकर उघडकिस येत असल्याचे प्रतिपादन पोलिस आयुक्त अकुंश शिंदे यांनी केले .
पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सोन्याचे दागिने, चार चाकी, दुचाकी, मोबाईल, लँपटाँप आदी घरफोडी चोरीस गेलेला मुद्देमाल फिर्यादी परत करण्यात आला. सर्व पोलीस ठाणे तसेच गुन्हेशाखा युनिट १, २ मध्यवर्ती गुन्हेशाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हयातील हस्तगत मुद्देमाल पोलिस आयुक्त अकुंश शिंदे यांच्या हस्ते १ कोटी ३६ लाख ०७ हजार ४३६ जप्त करण्यात आला.
१) सोन्याचांदीचे दागिने एकूण रु. ३८ लाख ९० हजार , ४२४/- किंमतीचे
२) दुचाकी एकूण किंमत रु. २५ लाख ७० हजार
(३) मोटार वाहन किमतीच्या एकुण किंमत रु. ५२ लाख ४० हजार किंमतीच्या.
४) मोबाईल फोन – एकूण रक्कम रु. ३ लाख २० हजार २६९/- किंमतीचे.
५) इतर मुद्देमाल – .एकूण रक्कम रु. १५ लाख ८६,हजार ७७०/- किंमतीचा
मुद्देमालाचे वाटप न्यायालयाच्या आदेशान्वये पोलिस स्थापना दिवस रेझिंग डे च्या निमित्ताने सोमवारी (दि ९) दिवशी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे हस्ते चोरीस गेलेली रोख रक्कम, पोलीस आयुक्तलय भिष्मराज सभागृह येथे मुद्देमाल वाटप करण्यात आले. नाशिक पोलीस आयुक्तालयात आता पर्यत ०७ वेळा मुद्देमाल वाटपाचा कार्यक्रम घेवुन त्यामध्ये एकुण ७ कोटी ७७ लाख ९३ हजार ९६३/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. फिर्यादी यांना परत करण्यात आलेला आहे.
आजच्या कार्यक्रमाचे वेळी उपस्थिती फिर्यादी पैकी फिर्यादी महेश रुईकर, विजय लाहोटी, नरेंद्र पवार, सुनिता तिदमे, सुनिल कर्डक, योगेशभाई पोमल, सुनंदा कुलकर्णी, अपूर्व दराडे, विनोद चौधरी कल्पना आहिरे, स्विटी जैन, सिमा सिंगानिया, किरण पाटील आदींनी मनोगत व्यक्त करून पोलीस खात्या विषयी आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली. सर्व सहा पोलीस आयुक्त, सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक व मुद्देमाल कारकुन व पोलीस अंमलदार यांच्या गुन्हयातील मुददेमाल वाटप करण्यात आला आहे . त्या गुन्हयाचे फिर्यादी व नाशिक शहरातील नागरीक मोठया संख्येने उपस्थितीत
Crime Nashik Police Return Theft Things to Complainant