इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – चित्रपटात एखाद्या खून प्रकरणाचा उलगडा करताना पोलिसांना खूप तपास करावा लागतो, असे दाखवले जाते. एखाद्या पुराव्यावरून पोलीस खुनी व्यक्तीवर पर्यंत बरोबर पोहोचतात. प्रत्यक्षातही काही वेळा असेच घडते. कानपूर शहरात एका प्रसिद्ध व श्रीमंत उद्योजकाच्या मुलाने आपल्या पत्नीचा खून केला. त्यासाठी त्याने तिचे अपहरण झाल्याचे बनाव रचला होता. मात्र एका छोट्याशा पुराव्याच्या आधारे पोलिसांनी अखेर या खुनाचा उलगडा केला.
कानपूरमधील प्रसिद्ध बिस्कीट उद्योजक आणि अब्जाधीश ओमप्रकाश दासानी यांचा मुलगा पियुष दासानी (वय ३०) याच्या पत्नीचे म्हणजेच ज्योती दासानी (वय २५) हिचे खंडणीसाठी अपहरण करून खून झाल्याचे पोलिसांना सांगण्यात आले. त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला. मात्र, खूनाचा तपास लागत नव्हता, परंतु तपासात परस्पर विरोधी माहिती समोर येत होती. अखेर पोलिसांनी खुद्द मयत महिलेचा पती पियुष याचा संशय आला. त्यादृष्टीने तपास चक्र फिरले असता, पियुषनेच खून केल्याचे उघड झालं.
आपले विवाहबाह्य संबंध तथा प्रेमप्रकरण पत्नीला कळाल्याने तिने ते आपल्या वडिलांना सांगू नये, यासाठी पियुषने खुद्द आपल्या पत्नीचा काटा काढला होता. त्यासाठी त्याच्या प्रेयसीची आणि एका कारचालकाची मदत घेतली होती, असे पोलीस तपासात आढळून आले. त्यानंतर त्याला तात्काळ अटक करण्यात आली.
Crime Murder Wife Husband Industrialist