इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – देशभरातील अनेक राज्यात महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे प्रमाण दरवर्षी कमी होण्याऐवजी वाढताना दिसते. विशेष म्हणजे या प्रकरणामध्ये संबंधित अल्पवयीन मुलगी, तरुणी किंवा महिलेच्या जवळच्या नातेवाईकांकडून तिच्यावर अशा प्रकारे अत्याचार करण्यात आल्याचे उघड झाले आहे, अशाच प्रकारची घटना हरियाणा मधील एका गावात घडली.
पोटातील निओप्लाझम आजाराच्या तपासणीसाठी कुटुंबीयांसह झज्जर येथील सामान्य रुग्णालयात दाखल झाली. मात्र, १२ वर्षीय ही अल्पवयीन मुलगी ४ महिन्यांची गरोदर असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोग्य तपासण्यासाठी मुलीचे अल्ट्रासाऊंड केले असता ही बाब उघडकीस आली. रुग्णालय व्यवस्थापनाने तत्काळ या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात पोहोचून पुढील कारवाई सुरू केली. पोलिसांनी या तरुणीच्या मेहूण्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.
या पीडित मुलीने गर्भपातास नकार दिल्याने सामान्य रुग्णालयात मुलीच्या समुपदेशनासाठी वन स्टॉप सखी सेंटरच्या वकिलांसह कर्मचाऱ्यांना पाचारण करून तिचे समुपदेशन करण्यात आले. महिला पोलीस ठाणे व शहर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मुलीचे सामान्य रुग्णालयात मेडिकल करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १२ वर्षांची मुलगी शहरातील एका परिसरात तिच्या आजीसोबत राहत असून तिची आई दिल्लीत साफसफाईचे काम करते. तर काही काळापूर्वी वडिलांचे निधन झाले होते. यानंतर मुलीची मोठी बहीणही पतीसमवेत तिच्या आजीच्या घरी आली. कारण काही दिवसांपूर्वी पिडीत मुलीचा मेहुणा म्हणजे मोठ्या बहीणीचा पती हा रस्ता अपघातात जखमी झाला होता आणि त्यावेळी तो देखील त्या आजीच्या घरी राहत होता. यापूर्वी तो रोहतक गावातील रहिवासी असून गुरुग्राममध्ये टॅक्सी चालक म्हणून काम करत होता.
लहान मेहूणीसोबत अनैतिक संबंध ठेवून मेव्हण्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. जेव्हा तिच्या पोटात दुखू लागले, आणि पोट वाढले तेव्हा तपासणी करण्यासाठी कुटुंबिय रुग्णालयात पोहोचले. मुलगी ४ महिन्यांची गर्भवती असल्याचे त्यात आढळून आले. सध्या समुपदेशनासोबतच मुलीच्या गर्भपाताची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून पिडीत मुलगी आणि तिच्या कुटुंबातील बहुतेक जण अशिक्षित आहेत. पोलिसांनी पोक्सो कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर आरोपीचा शोध सुरू करण्यात आला आहे.