इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बिहारमधील समस्तीपूर येथील एक अल्पवयीन मुलीने खुद्द तिच्या सख्ख्या आई, वडील आणि काकांवर गंभीर आरोप करत केले आहेत. पीडितेचे म्हणणे आहे की, तिच्या कुटुंबातील सदस्य पैशासाठी बलात्कार करतात. यासोबतच त्याचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता असे सांगत पीडितेने गावातील प्रमुखावरही चुकीचा आरोप केला आहे.
याप्रकरणी तिने पोलिसात तक्रार दिली आहे, तसेच या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. प्रकार तिच्या आई आणि वडिलांच्या देखरेखीखाली होत असल्याचे पीडितेचे म्हणणे आहे. पीडितेने तिच्या व्हायरल व्हिडीओमध्ये सांगितले की, “दररोज सुमारे 20 ते 25 लोक तिच्यावर बलात्कार करतात. आई घरी दारू विकते. पोलीस ठाण्यातील पोलीसही दारू पिऊन घरी येऊन तिच्यावर बलात्कार करतात. मी खूप दडपणाखाली जगत आहे. परंतु मला मदत करायला कोणी नाही. मला मदत करा, नाहीतर हे नातेवाईक मला मारतील.
विशेष म्हणजे मुलीने व्हिडिओमध्ये तिचा पत्ताही सांगितला आहे. पीडितेचे म्हणणे आहे की, तिने पोलिसात तक्रार केली नाही. कारण एसआय मनोज सिंह स्वतः तिच्यासोबत चुकीचे काम करतो. व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी मुलीची आई, वडील आणि एका तरुणाला अटक केली आहे.
यापिडीत मुलीचे वडील छोटे दुकान चालवतात आणि आई घर सांभाळते. मुलीने एकदा पोलिसांनाही घरी बोलावले होते, त्यानंतर घरावर छापा टाकला होता, पण पैसे देऊन सर्व काही मॅनेज केले होते. त्यानंतर वडिलांनी त्याच्यासोबत गैरकृत्य केले, असाही आरोप तिने केला आहे.
Crime Minor Girl Complaint Against family members Rape Bihar