इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – राजस्थानमधील जोधपूर शहरात एक अमानुष आणि धक्कादायक कृत्य समोर आले आहे. शहरातील एका दाम्पत्याच्या घरात काम करणाऱ्या नोकराने मालकिणीचा अश्लील व्हिडिओ बनवून तिच्यावर तब्बल ३ वर्षे बलात्कार केल्याचे समोर आले आहे. आणखी वाईट गोष्ट म्हणजे नोकराचा क्रूरपणा एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याला मालकिणीच्या मुलीचाही अश्लील व्हिडीओ बनवून तिचा बळी घ्यायचा होता. पण मालकिणीने नोकराविरूध्द गुन्हा नोंदवला. तसेच नोकराने मालकिणीला ब्लॅकमेल करून आठ लाख रुपयेही वसूल केले.
जोधपूरच्या सरदारपुरा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीच्या हस्तकला वस्तू विक्री दुकानात काम करणाऱ्या नोकरने आपल्या मुलीचा अश्लील व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल आणि विनयभंग केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. तशी तक्रार तिने पोलिसांना दिली आहे. आपल्या घरी आंघोळ करत असताना नोकर दुकानातून आला आणि त्याने आंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन नोकराने तिच्यावर बलात्कार केला. त्याचवेळी तो तिच्याकडे सतत पैशांची मागणी करत होता. महिलेने गेल्या ३ वर्षात तब्बल ८ लाख रुपये उकळल्याचे तक्रारीत म्हटले आहे. हा हैवान नोकर महिलेचा अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करत होता. यासोबतच त्याने महिलेच्या अल्पवयीन मुलीचाही आंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवला. आता अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करून तिच्यावर बलात्कार करण्याच्या प्रयत्नात होता. दरम्यान, मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून नोकराचा शोध सुरू आहे. तसेच पीडित महिलेचा अहवाल नोंदवल्यानंतर महिलेवर वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले आहेत. यासह आरोपी नोकरावर बलात्काराचा गुन्हा दाखल करून पॉक्सो कायद्यांतर्गत त्याचा शोध सुरू आहे.