अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात अत्यंत गंभीर घटना उघडकीस आली आहे. शहर परिसरात राहणाऱ्या एका १७ वर्षीय बारावीत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनी लव्ह जिहादची शिकार बनली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी हिंदू समाजाची आहे. हे माहीत असताना देखील सलमान शेख (रा. अहमदनगर) या तरुणाने रक्षाबंधन सणाचे निमित्त साधून भाऊ बनण्याचा बनाव रचला. एका हिंदू अल्पवयीन मुलीला त्याने फसवले. विद्यार्थिनी कडून राखी बांधून घेतली. त्यानंतर २६ ऑगस्ट रोजी दुपारी सदर पीडित तरुणी कॉलेजला जात असताना आरोपी सलमान शेखने तिला रस्त्यात अडवून तिच्या सोबत जबरदस्ती करण्यास सुरुवात केली. सोबत आली नाहीस तर जिवे मारण्याची धमकी देखील दिली. आरोपी सलमान शेख अल्पवयीन हिंदू विद्यार्थिनीला अहमदनगर सिद्धिबाग परिसरात जबरदस्तीने नेऊन तिच्यासोबत लज्जा उत्पन्न होईल असे अश्लील कृत्य केले.
यावेळी पीडित मुलीने जोरात आरडाओरड केली. मुलीचा रडण्याचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक जमले. नागरिकांनी पोलिसांना बोलवून घेतले. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही पोलीस स्टेशनमध्ये नेऊन पीडित मुलीला विचारपूस करून तिचा जबाब नोंदविला. तिच्या घरच्यांना बोलवून सर्व माहिती दिली. या विषयासंदर्भात अहमदनगर कोतवाली पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून गुन्हा दाखल केला. या घटनेने अहमदनगर शहरात पालक वर्गात प्रचंड खळबळ उडाली. आरोपी सलमान शेखला पोलिसांनी तातडीने अटक केली आहे. आरोपीने इतर मुलींबाबत असे प्रकार केले आहे का? याचा अतिशय काटेकोरपणे शोध घेणार असल्याचे पोलीस सूत्राने सांगितले.
Crime Love Jihad Girl Molestation Police