नवी दिल्ली – हैतीचे पंतप्रधान जोसेफ ज्यूथ यांनी देशातील वाढत्या हत्या आणि अपहरणांच्या संख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आपल्या पदाचा राजिनामा दिला आहे. ते गेल्या वर्षी मार्चपासून या पदावर कार्यरत होते. त्यांनी राजिनाम्याचं कारण दिलेलं नाही. ज्यूथ यांनी यापूर्वीही राजिनामा दिला होता. परंतु अध्यक्ष जोवेनेल मॉईस यांनी तो फेटाळला होता. यावेळी मात्र त्यांनी ज्यूथ यांचा राजिनामा स्विकारला आहे. २०१५ पासून हैतीमध्ये एकंदर आठ पंतप्रधान होऊन गेले आहेत.